बुधवार, ४ एप्रिल, २०१८

विभाज्यतेच्या कसोट्या/नियम

विभाज्यतेच्या कसोट्या/नियम

* संख्येतील एकक स्थानचा अंक सम असल्यास २ ने निःशेष भाग जातो.
* संख्येतील अंकाच्या बेरजेस ३ ने पूर्ण भाग गेल्यास - ६+४+२+३+६= २१/३=७
* संख्येतील शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस ४ ने निःशेष भाग गेल्यास अथवा संख्येत शेवटी कमीत कमी दोन शून्य असल्यास ४ ने निःशेष भाग जातो.
* संख्येच्या एककस्थानी ०किंवा५ असल्यास ५ ने निःशेष भाग जातो.
* संख्येला २ व ३ या दोन्ही संख्यांनी भाग गेल्यास ६ ने निःशेष भाग जातोच.
* संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस ८ ने भाग गेल्यास संख्येत शेवटी कमीत कमी ३ शून्य असल्यास ८ ने निःशेष भाग जातो.
* संख्येतील अंकाच्या बेरजेस ९ ने भाग गेल्यास - ७+५+६+३+६=२७/९=३
* संख्येतील सम व विषम स्थानाच्या अंकाच्या बेरजेतील फरक ० अथवा ११ च्या पटीत असल्यास. पर्याय ४ मधील समस्थानचे अंक - २+८=१०, विषम स्थानचे अंक - ५+३+२=१० क्लुप्तीनुसार १०-१०=०
* ज्या संख्येस ३ व ४ ने निःशेष भाग जातो, त्या संख्येला १२ ने भाग जातोच.
* ज्या संख्येस ३ व ५ ने निःशेष भाग जातो, त्या संख्येस १५ ने निःशेष भाग जातोच.
* ज्या संख्येस ४ व ९ ने निःशेष भाग जातो, त्या संख्येस ३६ ने निःशेष भाग जातोच. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.