रविवार, १५ एप्रिल, २०१८

केंद्राचा ग्रामस्वराज अभियान प्रकल्प - १६ एप्रिल २१०१८

केंद्राचा ग्रामस्वराज अभियान प्रकल्प - १६ एप्रिल २१०१८

* केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या धोरणानुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ५ मेपर्यंत ग्रामस्वराज्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

* सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिगत करणे, सद्यस्थितीत कार्यरत योजनांची माहिती घेईन. व नवीन उपक्रमामध्ये समावेश करून घेणे, स्वच्छता या कार्यक्रमांना पुढे नेण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहेत.

* देशातील अधिक गरीब कुटुंब असलेल्या २१,०५८ गावांची निवड अभियानासाठी केली आहे. त्यात राज्यातील २३ जिल्ह्यातील १९२ गावांचा समावेश आहे.

* सबका साथ सबका विकास या विशेष मोहिमेद्वारे पंतप्रधान उजाला, उज्वला, प्रत्येक घरात सहज वीज सौभाग्य, जनधन, जीवनज्योती विमा, सुरक्षा विमा, मिशन इंद्रधनुष्य अशा सात योजना सर्व गावामध्ये राबवत १०० टक्के योजना सर्व गावामध्ये राबवत आहेत.

* १८ एप्रिलला स्वच्छ भारत, २० ला उज्वला, २४ ला राष्ट्रीय पंचायत राज, २८ ला ग्रामस्वराज, ३० ला आयुष्यमान भारत २ मेस शेतकरी कल्याण, ५ मेस आजीविका दिवस साजरा करण्यात येणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.