रविवार, २९ एप्रिल, २०१८

राष्ट्रवादीच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड - २९ एप्रिल २०१८

राष्ट्रवादीच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड - २९ एप्रिल २०१८

* राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेक्षाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री जयंत पाटील यांची निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली.

* मावळते प्रदेक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने ही निवड करण्यात आली. दरम्यान उपाध्यक्षपदी नवाब मलिक, तर खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली.

* प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, आणि विधान परिषदेतील नेते धनंजय मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती.

* जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली.

* त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यालाच प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार असल्याची चर्चा होती.

* आपल्या भाषणशैली द्वारे सरकारची कोंडी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. राजकीय वादापासून कायम दूर राहणाऱ्या जयंत पाटील हे एक स्वच्छ प्रतिमेचे राजकीय नेते आहेत. याचा फायदा राष्ट्रवादी पार्टीला होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.