शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

पाणी साठवण्याच्या पद्धती

पाणी साठवण्याच्या पद्धती

* पाझर तलाव - महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात या पाझर तलावांची फार मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. यातील तत्व म्हणजे जलविरोधी खंदक कठीण खडकापर्यंत न नेता मध्येच थांबविला जातो. खंदक व खडक यांच्यामधून पाणी पाझरून जमिनीत राहते. त्यामुळे ओढा प्रवाहित राहतो.

* गावतळी - गावतळ्यामध्ये सुद्धा याचप्रमाणे पाणी साठविता येते. काही ठिकाणी त्याच जागेवर खणून मातीच्या खालचा भराव टाकून तलाव केला जातो. व पाणी साठविले जाते.

* नालाबंडींग किंवा नालाप्लगिंग - पाण्याचा साठा ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी तो केला गेला पाहिजे. डोंगरउतारावर एखाद्या ठिकाणी नाल्याचा प्रवाह ओहळ सुरु होतो. या प्रवाहावर वा नाल्यावर प्रवाहाच्या माथ्यापासून वा सुरवातीपासून एकाखाली एक अशा प्रकारे काही अंतरावर बांध टाकले जातात.

* हे बांध माती-मुरुमाने किंवा वाळूने सिमेंटचे असू शकतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.