मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

ऊस

ऊस

* ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील जमीन हवामान उसलागवडीखाली अनुकूल व पोषक आहे. तथापि, अलीकडील काही वर्षांपासून उसाचे उत्पादन घटत आहे.

* याउलट उत्पादनखर्च मात्र वाढत आहे. या कमी उत्पादनाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाचा काटेकोर उपयोग करणेही गरजेचे आहे.

* लागवडीचे तीन प्रकार - १] आडसाली - जून, जुलै, २] पूर्वहंगामी - ऑक्टोबर, नोव्हेंबर, ३] सुरु - डिसेंबर, जानेवारी - खोडवा हंगाम.

* आडसाली हंगामाचा ऊसतोडणीचा काळ हा पुढील वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर, पिकाचा एकूण कालावधी १८ महिने. हा हंगाम प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, फलटण, सातारा.

* पूर्वहंगाम - पुढीलवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी, एकूण १५ महिने, कोल्हापूर, सांगली, सातारा, फलटण सोडून.

* सुरु हंगाम - वर्षातील कधीही घेतला जातो, १२ ते १४ महिने, महाराष्ट्रातील ऊस पिकवणाऱ्या सर्वच जिल्ह्यात.

* उसाच्या जाती - को ११९, को ७४०, को एम ८८१२१ कृष्ण, ८६०३२ नीरा, को एम ७१२५ संपदा, गुळासाठी संपदा ही जात सर्वात चांगली मानली जाते.

* पिकावरील उपाय - खोडकिडा, हुमणी, वाळवी, काणी रोग, पायकीरा.

* जमीन - भारी अथवा मध्यम प्रतीची व पाण्याचा निचरा चांगला होणारी असावी. जमिनीची खोली ६० ते १२० सेमी असावी.

* पूर्वमशागत - पहिली नांगरट २० ते २५ सेमी खोलीची करतात. दुसरी नांगरट १० ते १५ दिवसांनी पहिल्या नांगरटीस आडवी करतात. ढेकळे फोडून कुळवाच्या उभ्या आडव्या दोन तीन पाळ्या देतात. नंतर हेक्टरी २० ते २५ गड्या शेणखत टाकतात.

* उत्पन्न - हेक्टरी १८० ते २०० मे टन उत्पादन मिळते. पूर्वहंगामी उसाचे हेक्टरी उत्पन्न १२५ ते १३० मे टन मिळू शकते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.