बुधवार, ४ एप्रिल, २०१८

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठ देशात ९ व्या स्थानावर - ४ एप्रिल २०१८

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठ देशात ९ व्या स्थानावर - ४ एप्रिल २०१८

* विद्येचे माहेर घर असलेल्या तसेच याचे नाव सार्थ ठरविताना पुण्यातील चार विद्यापीठांनी राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठामध्ये स्थान मिळविले आहे.

* केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दरवर्षी देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क [NIRF] ने ही यादी जाहीर केली आहे.

* या यादीत १०० विद्यापीठांचे वर्गीकरण करण्यात येते. यात सर्वसाधारण श्रेणी, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, आणि विधी अभ्यासक्रमांच्या शिक्षण संस्थांची श्रेणी निश्चित केली जाते.

* त्यासाठी गुणांकन देताना शिक्षक, शैक्षणिक संसाधने, संशोधन, त्याची उत्पादकता, पदवीधरांचे प्रमाण, सर्वसमावेशकता आणि संस्थेविषयी सार्वजनिक मत विचारात घेतले जाते.

* भारतातील प्रथम १० दर्जाची विद्यापीठे अनुक्रमे - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली), बनारस हिंदू विद्यापिठ (वाराणसी, अण्णा विद्यापीठ (चेन्नई), हैद्राबाद विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ (कोलकाता), दिल्ली विद्यापीठ, अमृता विश्व विद्यापीठ (कोईमतूर) यांचा समावेश आहे.

* केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १०० उत्कृष्ट राष्ट्रीय क्रमवारीत पुण्यातील देशात ९ व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, सिम्बॉयसेस इंटरनॅशनल ४४ व्या क्रमांकावर, डॉ डी.वाय.पाटील ५२ व्या क्रमांकावर, भारती विद्यापीठ ६६ व्या क्रमांकावर आहेत.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.