शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

विराट कोहलीची 'खेलरत्न' पुरस्कारासाठी शिफारस - २७ एप्रिल २०१८

विराट कोहलीची 'खेलरत्न' पुरस्कारासाठी शिफारस - २७ एप्रिल २०१८

* केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूची शिफारस करण्याची स्पर्धा देशामधील बहुविध क्रीडा संघटनांमध्ये दिसू लागली आहे. क्रिकेटसह राष्ट्रकुल तसेच जागतिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची नावे यात आघाडीवर आहेत.

* क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम 'खेलरत्न' पुरस्कारासाठी बीसीसीआयने भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुनीलगावस्कर आणि राहुल द्रविड यांची अनुक्रमे ध्यानचंद जीवनगौरव आणि द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाठविली आहेत.

* क्रिकेटपटू शिखर धवन, स्मृती मानधना यांची यापूर्वीच त्यांनी अर्जुन साठी शिफारस केली आहे. वेटलिफ्टिंग संघटनेने राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या मीराबाई चानू हिचे नाव अर्जुन साठी पाठविले आहे. या कामगिरीमुळे ती खेलरत्न साठीदेखील शर्यतीत असल्याचे मानले जाते.

* विशेष म्हणजे २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतच सुवर्णपदक मिळविल्यानंतर मीराबाईची अर्जुन साठी शिफारस करण्यात आली आहे. त्या वेळी पुरस्कार समितीने तिच्या नावाचा विचार केला नव्हता.

* द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस - राहुल द्रविड, विजय शर्मा, शिव सिंग, भास्कर भट्ट, संध्या गुरुंग. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.