सोमवार, ३० एप्रिल, २०१८

काही विशेष चालू घडामोडी - ३० एप्रिल २०१८

काही विशेष चालू घडामोडी - ३० एप्रिल २०१८

* वैश्विक क्रेडिट रेटिंग एजन्सी फीच ने भारताची रेटिंग [BBB] असे दिले आहे. त्यात कोणतीही सुधारणा केली नाही. भारताला यापूर्वी ११ वर्षांपूर्वी दिली आहे. फीच च्या रिपोर्टनुसार ७.३ दराने भारताची अर्थव्यवस्था वाढणार आहे. 

* राहुल भाटिया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड च्या निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच्या पहिले आदित्य घोष सीईओ च्या पदी होते. इंडिगो भारताची सगळ्यात मोठी एअरलाईन आहे. 

* दीव शहर भारतातील पहिले १००% नवीनीकरणीय ऊर्जा वर आधारित असणारे शहर बनले आहे. सर्व शहरात पुरविली जाणारी ऊर्जा ही १००% नवीनीकरणीय उर्जेवर आधारित आहे. 

* कंजरव्हेटिव्ह पूर्व सिनेटर मारियो एब्दो बेनिटेज यांची पॅराग्वे च्या राष्ट्रपतीच्या पदासाठी नियुक्त करण्यात आले. 

* पश्चिम बंगाल मधील दिगंबरपुर ग्राम पंचायत देशातील केंद्राचा सर्वश्रेष्ठ ग्रामपंचायतचा पुरस्कार देण्यात आला आहे. देशात २.५ लाख ग्रामपंचायत असून त्यापैकी १००० ग्रामपंचायत मधून याची निवड करण्यात आली. 

* जगाचे नंबर वन राफेल नडाल याने मोंन्टे कार्लो मास्टर्स फायनल ३१ वा किताब जिंकला आहे. त्याने जपानच्या की के निशिकोरी ला ६-३, ६-२ से पराभूत केले. 

* बार्सिलोना ने फायनलमध्ये सेविला संघाला ५-० च्या फरकारने एका वर्षात [कोपा डेल रे] खिताब जिंकून पहिल्या क्रमांकाची टीम बनली आहे. 

* जगातील सर्वात वृद्ध महिला असणाऱ्या जपानमधील नबी ताजीमा यांची वयाच्या ११७ वर्षी निधन झाले आहे. 

* नासाच्या १३ वे नवे व्यवस्थपक म्हणून जिम ब्रेडेन्सटाईन यांची निवड करण्यात आली आहे. याची निवड अमेरिकी सिनेटच्या डोनाल्ड ट्रम्पच्या प्रतिनिधी मंडळनी त्यांची निवड केली. 

* दिल्लीत ५ जी इंडिया काँग्रेस २०१८ चे आयोजन करण्यात येणार आहे. याचा उद्देश भारतात २०२० पर्यंत ५ जी नेटवर्कचे जाळे पोहोचविणे आहे. 

* भारत जगातील ६ वी मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अनुक्रमे अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, आणि ब्रिटन हे देश आहेत. सध्या भारताची अर्थव्यस्थेचे मूल्य २.६ ट्रिलियन डॉलर आहे. भारताने फ्रांसला मागे सोडून ६ वे स्थान प्राप्त केले आहे. 

* साऊदी अरब मध्ये ३५ वर्षपासून आता पहिल्यांदा फिल्म थिएटर उघडण्यात आले. यापूर्वी साऊदी समाजाच्या धर्मानुसार १९८० पासून देशातील सिनेमाघरावर निर्बंध लावण्यात आले होते. 

* दिलीप चेनॉय फिक्की चे नवे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री [FICCI] ही संस्था भारताची एक उद्योग व वाणिज्यिक संस्थांची प्रश्न व नियम यावर देखरेख ठेवते. 

* भारतीय स्टेट बँक अर्थात SBI भारतातील सर्वात विश्वसनीय बँक ठरली असून खासगी बँकेत ICICI बँक अग्रणीय आहे. 

* केंद्राने नवीन जिल्हा विकास योजना लागू केली असून त्यात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  उत्तरप्रदेश मधील वाराणसी, बिहारमधील मुज्जफरपुर, आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टम हिमाचल प्रदेशमधील सोलन या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. 

* प्रसिद्ध पत्रकार एस निहाल सिंह यांचे निधन झाले आहे. ते द स्टेट्समॅन आणि द इंडियन एक्स्प्रेस चे पूर्व मुख्य संपादक म्हणून कार्य करत होते. 

* भारतातील टॅलेंट वर खर्च करण्यात बंगलोर शहर प्रथम क्रमांकावर आहे. हे शहर ११ लाख प्रतिभेवर खर्च करते, त्यानंतर पुणे १० लाख, त्यानंतर एनसीआर आणि मुंबई यांचा क्रमांक लागतो खर्च ९ लाख रुपये. 

* न्यूयॉर्क टाइम्स व न्यूयॉर्कर ने सार्वजनिक वृत्तपत्र सेवाच्या श्रेणीत २०१७ चा पुलित्झर पुरस्कार प्राप्त केला. 

* पॅरिस आणि उत्तरी फ्रांस च्या अमिन्स या दोन शहरादरम्यान जगातील पहिली इलेकट्रीक बस सुरु करण्यात आली आहे. ही बस २६० किलोमीटर अंतर केवळ २ घंट्यात पार करेल.

* भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा कार बाजार बनला आहे. भारताच्या पुढे अनुक्रमे चीन, अमेरिका, व जपान आहे. पाचव्या क्रमांकावर जर्मनी आणि सहाव्या ब्राजील, सातव्या फ्रांस हे देश आहेत. भारतात २ महिन्यात ५,६०,८०६ कार विकल्या गेल्या आहेत.

* भारती एंटरप्रायजेज चे नवीन अध्यक्ष म्ह्णून राकेश भरती मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* ऋषभ प्रेमजी NASSCOM चे नवीन अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहेत. नॅसकॉम ही भारतीय आयटी आणि व्यापार प्रक्रिया आऊटसोर्सिंग व्यापार मंच आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.