सोमवार, २ एप्रिल, २०१८

संतोष ट्रॉफी फुटबॉल केरळने जिंकली - २ एप्रिल २०१८

संतोष ट्रॉफी फुटबॉल केरळने जिंकली - २ एप्रिल २०१८

* देशातील प्रतिष्ठेच्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळने पश्चिम बंगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२, [२-२] ने पराभव करत विजेतेपद पटकावले.

* केरळने या स्पर्धेचे ६ वेळा विजेतेपद पटकाविले. पश्चिम बंगाल कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती मैदानात झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी चुरशीचा खेळ केला.

* सामन्याच्या सुरवातीला केरळने चांगला खेळ केला. १९ व्या मिनिटाला जितीन एम एस ने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

* त्यानंतर पिछाडीवर पडलेल्या बंगालने दमदार प्रदर्शन करीत खेळ उंचावला मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. पहिल्या हाफमध्ये केरळने १-० ही आघाडी कायम ठेवली.

* ११८ व्या मिनिटाला विबीनने गोल करत केरळला आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या हाफमध्ये बंगालमध्ये फ्री-किकद्वारे गोल करत सामन्यात कमबॅक केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.