शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूला सुवर्णपदक - ६ एप्रिल २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूला सुवर्णपदक - ६ एप्रिल २०१८

* राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टिंगच्या यशाने भारतीय मोहिमेस सुरवात झाली. पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने ४८ किलो वजनी गटात स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

* त्यापूर्वी पुरुष विभागात गुरूराजाने रौप्यपदक मिळविले. जागतिक स्पर्धेतील विजेतेपदाला साजेशी कामगिरी करताना मीराबाईने ४८ किलो वजनी गटात एकूण १९६ किलो वजन उचलण्याचा स्पर्धा विक्रमही केला.

* यापूर्वी तिने १९४ किलो वजन उचलले होते. तिने नायजेरियाच्या ऑगस्टीना न्हावोकोलो हिचा १७५ किलोचा विक्रम मोडीत काढला.

* गुरूराजाने पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरल्यानंतरही २४९ किलो वजन उचलून रौप्यपदकाला गवसणी घातली. गेल्या स्पर्धेत गुरुराजा ब्राँझपदकाचा मानकरी ठरला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.