मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

सूर्यफूल

सूर्यफूल

* पेरणी व मशागत - खाद्यतेलाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्रात अलीकडील काळात नव्यानेच हे तेलबियांचे पीक घेतले जाते. सूर्यफुलाचे तेल रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. शिवाय या पिकाची काही खास वैशिष्ट्ये आहेत.

* जमीन - हे पीक हलक्या ते भारी जमिनीत येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन हवी.

* पूर्वमशागत - या पिकाची मुळे खोल जाणारी असल्यामुळे  २० ते २५ सेमी खोल नांगरट करतात. तसेच कुळवाच्या तीन चार पाळ्या दिल्यानंतर धसकटे, कचरा वेचतात. हेक्टरी १५ ते २५ गाड्या शेणखत घातले जातात.

* पेरणी खरीप - उसावरील एक दोन पाऊस झाल्यावर, जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचा पहिला आठवडा उत्तम. टोकण पद्धत जास्त चांगली. ६०/३० सेमी अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक बी टोकतात.

* आंतरमशागत - पेरणीनंतर १५ दिवसात विरळणी करतात. तीन आठवड्यात पहिली कोळपणी व नंतर १५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी लागते. गरजेनुसार एक दोन खुरपण्या करणे उपयुक्त असते. हे काम पेरणीनंतर दीड महिन्याच्या आत पूर्ण करावे लागते.

* पिकावरील रोग - केसाळ अळी, तुडतुडे, पांढरी माशी, या किडीसाठी ७१५ मिली एन्डोसल्फान तर अल्टरनेरिया या रोगामुळे तांबोरा व ठिपके दिसतात. खरीप हंगामात हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो.

* उत्पन्न - साधारणपणे प्रतिहेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते.



















0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.