गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

पॉप संगीत समूह बीटीएस समूहाला टाइम्सचा पर्सन ऑफ द इयर किताब - १९ एप्रिल २०१८

पॉप संगीत समूह बीटीएस समूहाला टाइम पर्सन ऑफ द इयर किताब - १९ एप्रिल २०१८

* टाइम मासिकाच्या ऑनलाईन वाचक सर्वेक्षणात यंदा दक्षिण कोरियाचा पॉप संगीत समूह [बीटीएस] ने बाजी मारत हा किताब जिंकला.

* लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित टाइम मासिकाच्या [पर्सन ऑफ द ईअर] ने सलग दुसऱ्यांदा हुलकावणी दिली.

* १०० प्रभावशाली लोकांच्या या यादीमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे इन यांनी दुसरा तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

* दक्षिण कोरियाच्या पॉप संगीत समूहाने बिलबोर्डच्या सोशल यादीमध्ये २०१७-२०१८ असा सलग दोन वर्षे आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.

* तर गतवर्षी बिलबोर्डच्या सोशल यादीमध्ये जागतिक स्तरावरील सर्वाधिक सक्रिय संगीतकार आणि गायकाला स्थान दिले जाते.

* बीटीएसला टाइम च्या २०१७ च्या सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तीच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले होते. त्यावेळी त्यांना विजय मिळवता आला नव्हता.

* मात्र यंदा या समूहाने टाइम च्या पर्सन ऑफ द इयर २०१८ चा किताब आपल्या नावावर केला. ऑनलाईन वाचक सर्वेक्षणात बीटीएसने १५ टक्के मते मिळविली.

* यानंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मुन जे इन यांना पाच तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ३% मते पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी कमी मते पडली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.