मंगळवार, १० एप्रिल, २०१८

कृषीविषय व कृषी अर्थशास्त्र

कृषीविषय व कृषी अर्थशास्त्र

१] जमिनीचा वापर व प्रमुख पिके 

[जमीनवापराचे वर्गीकरण]

* अर्थशास्त्रात जमीन या शब्दाचा अर्थ व्यापक दृष्टिकोनातून घेतला जातो. निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टीचा समावेश जमीन या संकल्पनेत केला जातो.

* जमीन वापराच्या वर्गीकरणास इंग्रजीत [Land Utilization Classification] असे म्हटले जाते. देशाच्या भौगोलिक कक्षेत येणाऱ्या सर्व जमिनीसंबंधी व त्यांच्या वापरासंबंधी माहिती शासन गोळा करते.

* आपल्या देशातील  बहुतेक प्रदेशाची मोजणी [कॅडेस्ट्रल सर्व्हे] करण्यात आला. तथापि काही दुर्गम प्रदेशाची व वनांची मोजणी करणे दुरापास्त ठरले.

* वर्गीकरणाच्या पद्धतीतही बदल करण्यात आले. १९४९ मध्ये भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी फक्त ८४% क्षेत्राची माहिती उपलब्द होती. भौगोलिक क्षेत्रापैकी ९२.९ टक्के क्षेत्रासंबंधी माहिती उपलब्द आहे.

[ जमिनीचे वापरानुसार वर्गीकरण ]

१] वने - यात शासकीय वनक्षेत्राप्रमाणेच खाजगी मालकीच्या वनांचाही समावेश होतो.

२] बिगरशेती - वापराखालील जमीन - यात इमारती, रस्ते, रेल्वे, नद्या, कालवे, अशा बिगरशेती वापराखालील जमिनींचा अंतर्भाव केलेला असतो.

३] ओसाड जमीन (मशागतीस अयोग्य जमीन) - यात ओसाड, खडकाळ तसेच तद्त्वतच डोंगराळ जमीन आणि वाळवंटी जमीन अशा जमिनीचा लागवडीस अयोग्य जमिनीचा समावेश होतो.

४] कायमची कुरणे व चराऊ कुरणे - यात सर्व प्रकारची चराऊ राने व इतर गवताळ जमिनी येतात.

५] झाडे-झुडुपे प्रकारची जमीन - निव्वळ पेरलेल्या क्षेत्रात समाविष्ट न केलेले पण इतर प्रकारचे शेतीक्षेत्र म्हणजे वृक्षवाटिका, आमराया, व इतर वृक्षराजी यात मोडतात.

६] मशागतयोग्य पडीत जमीन - ज्या जमिनी लागवडीलायक आहेत. परंतु सध्या लागवडीखालील नाहीत अशा जमिनी या वर्गात मोडतात. थोडक्यात पूर्वी लागवडीखाली आणलेल्या आणि मागील ५ वर्षापेक्षा अधिक काळ ज्या जमिनीत लागवड झाली नाही अशा जमिनी या सदरात मोडतात.

७] चालू पड - चालू पड म्हणजे एक वर्षापेक्षा कमी काळ पडीत राहिलेली जमीन.

८] इतर पडजमीनी - जी जमीन लागवडीखालील आणलेली पण तात्पुरती एक वर्षाहून अधिक परंतु पाच वर्षापेक्षा कमी काळ लागवडीखाली आलेली नाही अशी जमीन.

९] निव्वळ पेरलेले क्षेत्र - यात पिकाखालील क्षेत्राचा समावेश होतो. मात्र त्या वर्षी एकापेक्षा अधिक वेळा  पेरलेले क्षेत्र केवळ एकदाच मोजले जाते.

[ महाराष्ट्रातील जमीनवारपार]

* महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३,०७,७१३ चौकिमि इतके आहे. त्यात गेल्या तीन दशकात बदल झालेला नाही. अगदी अलीकडील म्हणजे २०११ मध्ये उपलब्द झालेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, राज्याचे जमीन वापराखालील नोंदीत भौगोलिक क्षेत्र ३,०७,५८,३०० हेक्टर्स इतके आहे.

* राज्यातील वनांखालील क्षेत्र एकूण भू-क्षेत्राच्या १६.४५ टक्के इतके आहे. राज्याचा ऐकून भू क्षेत्रापैकी ५.६१ टक्के जमीन ओसाड, मशागतीस अयोग्य आहे. बिगरशेती वापराखाली आणलेले क्षेत्र  एकूण क्षेत्राच्या ४.०४ टक्के गायराने, चराऊ कुरणे, व किरकोळ झाडे झुडपे आहेत.

* ८.३५ टक्के क्षेत्र चालू पड व इतर पड या सदरात मोडते. पिकाखालील निव्वळ क्षेत्र ५६.५३ टक्के असून दुसोटा तिसोटा क्षेत्र १८.६० टक्के आहे. [दुसोटा तिसोटा क्षेत्र हे पिकाखालील निव्वळ क्षेत्रापैकीच असते.

[महाराष्ट्रातील सिंचित क्षेत्राचे प्रमाण]

* महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१३-१४ अनुसार सन २०११-१२ मध्ये राज्यातील लागवडीखालील स्थूल क्षेत्र २ कोटी ३१ लाख ६ हजार हेक्टर इतके होते.

* त्यापैकी निव्वळ कसलेले म्हणजे निव्वळ पेरणी  क्षेत्र १ कोटी ७३ लाख ८६ हजार हेक्टर इतके होते. सन २००९-१० मध्ये राज्यातील एकूण ४० लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते.

* ओलिताखाली एकूण क्षेत्राची प्रमाण ६.४८ टक्के होत. २००८ -०९ मध्ये १७.७ व २००९ - १० मध्ये १७.९% याप्रमाणे कमी जास्त होत गेले.

[महाराष्ट्रातील शेती धारणाक्षेत्र वर्गीकरण]

* भारतात १९७०-७१ पासून दर दहा वर्षांनी कृषिगणना केली जाते. त्याशिवाय दर पाच वर्षांनी नमुना पाहणी करण्यात येते. यावरून आपणास सीमान्त, लहान, मध्यम, मोठे जमीनधारक व ते कसत असलेली जमीन तसेच शेतीक्षेत्राचे सरासरी प्रमाण कळून येते.

जमिनीचे आकारमान [हेक्टर]           धारक संख्या[लाखात]
     ०.५ हून कमी                                    ३६.४५%
     ०.५ ते १.०                                        ३०.६३%
     १.० ते २.०                                        ४०.५२%
     २.० ते ३.०                                        १५.४६%
     ३.० ते ४.०                                         ६.१२%
     ४.० ते ५.०                                         ३.१४%
     ५.० ते १०.०                                       ०.५९
     २०.० ते अधिक                                 ०. ०८९

वहीत जमिनीचे एकूण क्षेत्र [हेक्टर]       धारण जमिनीचे सरासरी क्षेत्र
         ९.१८                                            ०.२५
       २२.६८                                            ०.७४
       ५७.३९                                            १.४२
       ३६.६८                                            २.३७
       २०.९७                                            ३.४२
       १३.९०                                            ४.४२
       २६.०२                                            ६.५७
       ७.५२                                              १२.७५
       ३.३१                                              ३७.२४

* वरील माहितीवरून असे दिसून येते की, लहान धरणाक्षेत्राच्या धारकांची संख्या मोठी आहे. पण त्यांचे धरणक्षेत्र तुलनेने कमी आहे.

* मोठ्या जमीनधारणकांची संख्या कमी असून त्यांचे जमीन धारणक्षेत्र सरासरी पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या वहित जमिनीचे [प्रत्येक धारकामागे] सरासरी धरणक्षेत्रात फक्त १.४४ हेक्टर आहे.

* मोठी संख्या एक ते दोन हेक्टर क्षेत्रधारकांपैकी म्हणजेच लहान शेतकऱ्यांची आहे. सन १९७०-७१ च्या कृषीगणनेशी तुलना करता लहान धारणाक्षेत्राच्या धारकांची संख्या वाढली आहे.

* मोठ्या धारणाक्षेत्राच्या धारकांची संख्या बरीचशी घटली आहे.  तथापि, आजही राज्यातील जमीन-वाटपात विषमता असल्याचे जमीन-धारणक्षेत्राच्या वर्गीकरणावरून दिसून येते. एकूण भारताचे चित्रही फारसे वेगळे नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.