शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १९ एप्रिल २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १९ एप्रिल २०१८

* अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्लू. बुश यांच्या पत्नी बारबरा बुश यांचे १७ एप्रिल रोजी ९२ वर्षी निधन झाले. राष्ट्राध्यक्षांची पत्नी या नात्याने त्या अमेरिकेच्या माजी प्रथम महिला होत्या.

* पाकिस्तानमध्ये तृतीयपंथीयांसाठी पहिल्या शाळेचे १६ एप्रिल राय उदघाटन करण्यात आले. एक्सप्लोरिंग फ्युचर फाउंडेशन हा प्रकल्प आहे.

* प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार एस निहाल सिंग यांचे १६ एप्रिल रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

*  ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या राहुल अवारेने भारताला कुस्तीतलं पाहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

* जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानचे ११२ वर्षीय मसाझो नोनाका यांचा जन्म २५ जुलै १९०५ मध्ये झाला होता.

* माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. पार्कर सोलार प्रोब सूर्यावर पाठविण्याची तयारी.

* विधी आयोगाने भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ BCCI याला त्याच्या घटनात्मक सदस्य क्रिकेट संघासह माहितीचा अधिकार RTI या कायद्याच्या कार्यक्षेत्रात आणण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे.

* देवेंद्रा प्रभुदेसाई लिखित 'विनींग लाईक सचिन: थिंक अँड सक्सीड लाईक तेंडुलकर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यात सचिनच्या जीवनाचा प्रवास लिहिला आहे.

* लेफ्ट जनरल पी पी मल्होत्रा यांनी ११ एप्रिल २०१८ रोजी राष्ट्रीय सेना NCC संघटनेच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

* स्वीडनची राजधानी स्टोकहोम येथे १७ एप्रिल २०१८ पासून प्रथम भारत नोडरीक शिखर परिषद चा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत उपस्थित आहेत.

* भारतीय चित्रकार राम कुमार यांचे १४ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. रामकुमार यांची व्हेगाबॉण्ड आदी चित्रे आर्थिक सामाजिक वास्तव दाखवणारी होती.

* जगात प्रथमच भारतीय वैज्ञानिकांनी डेंग्यूच्या आजारावरील औषध विकसित केले आहे. त्याच्या प्राथमिक चाचण्या पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत.

* नवी दिल्लीत २५ ते २७ ऑक्टोबर २०१८ या काळात नवी दिल्लीत 'भारत मोबाईल काँग्रेस २०१८' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

* मॉरिशसच्या शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते ११ एप्रिलला जागतिक हिंदी परिषदेच्या ११ व्या संस्करणाच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळांचे अनावरण करण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.