बुधवार, ४ एप्रिल, २०१८

दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - ४ एप्रिल २०१८

दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - ४ एप्रिल २०१८

* दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा जोहान्सबर्ग कसोटी सामना मॉर्केलच्या कारकिर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

* या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ४९२ धावांनी मात करत मॉर्केलला निरोप दिला. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा मॉर्केलची कसोटीतील पाहिली विकेट होती.

* मॉर्केलने आजवरच्या क्रिकेटमध्ये ८६ कसोटी, ११७ वन डे, आणि ४४ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच प्रतिनिधित्व केलं होत.

* २८८ आंतरराष्ट्रीय सामन्यात मॉर्केलच्या नावावर ५४४ विकेट्स जमा आहेत. कसोटीत ३०६, वन डेमध्ये १८८ आणि टी-२० मध्ये त्याने ४७ फलंदाजांना माघारी धाडल.

* मॉर्केलने ऑस्ट्रेलियातील केपटाउनच्या तिसऱ्या कसोटीत एक मोठा विक्रमही केला. त्याने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या आणि यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत त्यात समावेश झाला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.