गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

व्हॉट्सअँप युजर्ससाठी किमान १६ वर्षे वयाची अट - २६ एप्रिल २०१८

व्हॉट्सअँप युजर्ससाठी किमान १६ वर्षे वयाची अट - २६ एप्रिल २०१८

* फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेलेले प्रकरण चांगलेच गाजत असताना आघाडीचे मेसेजिंग अँप व्हॉट्सअँप ने वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 

* फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअँप कंपनीने आता १६ वर्षाखालील मुलावर खाते उघडण्यास बंदी घातली आहे. हा नवीन नियम मे महिन्यापासून फक्त युरोपियन संघ अर्थात ईयूतील देशासाठी लागू होईल. 

* काही दिवसांनी हे नियम भारत व इतर देशांना लागू होतील. आजघडीला जगभरात  व्हॉट्सअँप चालविण्यासाठी १३ वर्षाची वयोमर्यादा लागू होईल. 

* परंतु २५ मेपासून युरोपियन संघामध्ये नवीन माहिती गोपनीय नियम लागू केले जातील. या नियमांबरोबरच  व्हॉट्सअँप चालविण्याची  व्हॉट्सअँप चालविण्याची वयोमर्यादा १६ इतकी करण्यात आली. 

* नवीन नियम लागू होताच वापरकर्त्यांनी वापरकर्त्यांची आपल्या वयाची खात्री करून घ्यावी, असे कंपनीने सांगितले आहे.

* जनरल डेटा संरक्षण नियम अर्थात जीडीपीआर मुळे लोकांना आपल्या वैयक्तिक माहितीवर अधिक नियंत्रण मिळेल. त्यामुळे कंपन्या या माहितीचा वापर कशा पद्धतीने करतात. हे समजून घेण्यास लोकांना मदत होणार आहे.

* इतकेच नाही, तर वापरकर्त्यांना आपली वैयक्तिक माहिती पूर्णपणे मिटविता येईल. सोबतच वापरकर्त्यांना कंपनीकडे असलेल्या आपल्या माहितीची एक प्रतही डाउनलोड करता येईल.

* नवीन नियमाची अंमलबजावणी फक्त युरोपियन संघातील देशामध्ये केली जाणार आहे. तर उर्वरित जगासाठी व्हॉट्सअँप चालविण्याची वयोमर्यादा १३ इतकी ठेवण्यात आली आहे.

* उल्लेखनीय म्हणजे फेसबुकच्या इंस्टाग्राम सेवेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांना डेटा डाउनलोड ची सुविधा दिली जाणार आहे.

* विशेष म्हणजे स्नॅपचॅट, युट्युब, इंस्टाग्राम, पिंटरेस्ट, आणि ट्विटर यासारख्या आघाडीच्या सोशल माध्यमावरही १३ वर्षापर्यंत निर्बंध लावण्यात आलेले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.