सोमवार, १६ एप्रिल, २०१८

अमजद अली यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१८ जाहीर - १६ एप्रिल २०१८

अमजद अली यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१८ जाहीर - १६ एप्रिल २०१८

* मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०१८ ची घोषणा करण्यात आली होती. ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

* मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि हृद्देश आर्ट्सच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची कन्या आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

* सिनेसृष्टीतील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर तर उद्योगक्षेत्रातील कामगिरीसाठी धनंजय दातार यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

* सर्वोत्कृष्ट नाटकाचा मोहन वाघ पुरस्कार अनन्या नाटकाला जाहीर झाला आहे. प्रताप फड दिग्दर्शित अनन्या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.