शनिवार, २८ एप्रिल, २०१८

भारताच्या जागतिक व्यापारात १६% वाढ - २८ एप्रिल २०१८

भारताच्या जागतिक व्यापारात १६% वाढ - २८ एप्रिल २०१८

* भारताचा जागतिक व्यापार २०१७-१८ साली १६.३२ टक्क्यांनी वाढून ७६७.९ अब्ज डॉलर सुमारे ५० लाख कोटी पोहोचला आहे.

* २०१६-१७ साली भारताचा जागतिक व्यापार ६६०.२ अब्ज डॉलर मूल्याचा होता. केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार लॅटिन अमेरिकेतील देशासोबतच्या भारताच्या व्यापारात १९.६३ टक्के वाढ झाली आहे.

* अशा देशामध्ये बोलिव्हिया, पेरू, चिली व ब्राझीलसह अन्य लॅटिन अमेरिकी देशांचा समावेश आहे. बोलिव्हियासोबत २०१६-१७ साली भारताने २५.३० कोटी डॉलरचा व्यापार केला होता.

* तर २०१७-१८ साली या देशासमोर ७७.२४ कोटी डॉलरचा व्यापार केला आहे. म्हणजे या देशासोबतच्या व्यापारात तब्बल २०५% अशी वाढ झाली आहे.

* अशाच प्रकारे ब्राझीलसोबत २०१६-१७ साली भारताने ६.५१ अब्ज डॉलर मूल्याचा व्यापार केला होता. तो वाढून आता ८.५६ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. सर्व लॅटिन अमेरिकी देशासोबत भारताचा व्यापार २०१६-१७ साली २४.५२ अब्ज डॉलर मूल्याचा झाला होता. २०१७-१८ साली तो २९.३३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.