गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

देशात ४ जी डाउनलोडच्या स्पीडमध्ये एअरटेल देशात प्रथम - २० एप्रिल २०१८

देशात ४ जी डाउनलोडच्या स्पीडमध्ये एअरटेल देशात प्रथम - २० एप्रिल २०१८

* भारताच्या टेलिकॉम कंपन्यामध्ये काही वर्षांपासून स्पर्धा सुरु आहे. विशेष म्हणजे जियो आणि भरती एअरटेल यांच्यात खूप स्पर्धा पाहायला मिळते.

* १ डिसेंबर २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत केलेल्या पाहणीनंतर हा अहवाल सादर करण्यात आला आहे. ओपन सिग्नलच्या अहवालानुसार देशात ४ जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत एअरटेलने जियो वोडाफोन आणि आयडिया यासारख्या सर्व स्पर्धकांना मागे टाकले आहे.

* जर ३ जी चा विचार केला तर त्यातही एअरटेलने बाजी मारली आहे. जियोला केवळ उपलब्दतेच्या बाबतीतच एअरटेलवर मात करता आली असून यामध्ये जियो अव्वल ठरलं आहे.

* देशात गेल्या ६ महिन्यामध्ये देशातील ४ जी नेटवर्कची स्थिती काही प्रमाणात सुधारली असून देशातील अग्रगण्य कंपन्यांनी ६५ टक्के LTE उपलब्दतेचा आकडा गाठला आहे.

* विविध कंपन्यांचा देशातील सरासरी ४जी डाउनलोड स्पीड - एअरटेल - ९.३१ Mbps, आयडिया ७.२७ Mbps, वोडाफोन ६.९८ Mbps, जियो ५.१३ Mbps एवढा या ठिकाणी स्पीड आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.