शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

६५ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - १३ एप्रिल २०१८

६५ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - १३ एप्रिल २०१८

* संपूर्ण भारतीय कलाविश्वास लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रम येथून करण्यात आली.

* चित्रपट क्षेत्रातील विविध विभागासाठी हे पुरस्कार हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या परीक्षासाठीच्या ज्युरींच नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केलं होत.

* ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटाच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. 'मृत्यूभोग' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या [कच्चा निंबू] या चित्रपटाला जाहीर झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबत राष्ट्रीय पुरस्काराच्या ज्यूरीची मने जिंकली.

* तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा न्यूटन हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

* नागराज मंजुळेच्या पावसाचा संबंध या लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

[पुरस्काराची यादी] मराठी चित्रपट

* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा निंबू
* सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या
* स्पेशल मेन्शन - म्होरक्या
* सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्यूभोग
* सर्वोत्कृष्ट लघुपट - मयत - सुयश शिंदे
* सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा - राजेंद्र जंगले
* नर्गिस दत्त पुरस्कार - धप्पा - निपुण धर्माधिकारी

[ पुरस्कराची यादी ] हिंदी चित्रपट

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी मॉम
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दिव्या दत्ता
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन [निर्माता - अमित मसुरकर]
* सर्वोत्कृष्ट साहसी दृश्य - अब्बास अली मोगल
* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस - बाहुबली २
* सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य [गोरी तू लठ मार - टॉयलेट एक प्रेम कथा]
* स्पेशल मेन्शन - अभिनेता पंकज त्रिपाठी - न्यूटन
* सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड - ए आर रहमान - मॉम चित्रपट

राष्ट्रीय पुरस्कार [प्रादेशिक पुरस्कार]

* सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट - गाझी
* सर्वोत्कृष्ट लडाखी चित्रपट - वॉकिंग विद द विंड
* सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट - टू लेट
* सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट - मयूरक्षी
* सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - हेब्बत रामाक्का
* सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - थोंडीमुथलम दृकशियम
* सर्वोत्कृष्ट ओरिया चित्रपट - हॅलो आर्सी
* सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - दह
* सर्वोत्कृष्ट असामी चित्रपट - इशू 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.