शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

यूजीसीकडून २४ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर - २७ एप्रिल २०१८

यूजीसीकडून २४ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर - २७ एप्रिल २०१८

* विद्यापीठ अनुदान आयोगाने युजीसी देशातील २४ बोगस विद्यापीठाची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीतील तब्बल सात विद्यापीठे आहेत. तर महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे.

* बोगस विद्यापीठ म्हणून जाहीर केलेल्या यादीतील विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन फसवणूक झाल्यास त्याला आयोग जबाबदार असणार नाही. असा इशाराही आयोगाने पालक आणि विद्यार्थ्यांचा दिला आहे.

* तसेच या विद्यापीठांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आला नाही. असे आयोगाने निवेदनात म्हटले आहे. नागपूर येथील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचा या बोगस विद्यापीठांच्या यादीत समावेश आहे.

* कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशन युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरींग विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, अध्यात्मिक विश्वविद्यालय या दिल्लीतील विद्यापीठाचा समावेश आहे.

* विद्यापीठ अनुदान आयोगाने बिहारमधील मैथिली विद्यापीठ, केरळमधील सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, यासह
कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, पॉंडिचेरी येथील बोगस विद्यापीठांची नावे या यादीत आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.