रविवार, २२ एप्रिल, २०१८

भारतात कॅम्पुटर युजर्सपेक्षा सर्वाधीक मोबाईल युजर्स - २३ एप्रिल २०१८

भारतात कॅम्पुटर युजर्सपेक्षा सर्वाधीक मोबाईल युजर्स - २३ एप्रिल २०१८

* सर्वाधिक मोबाईल युजर्स असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. स्वस्त स्मार्टफोन, स्वस्तात उपलब्द असलेले डेटा पॅक यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

* कॉमस्कोअर च्या अहवालानुसार भारतीय त्यांच्या एकूण डिजिटल मिनिट्सपैकी ९०% वेळ ही मोबाइलरून ऑनलाईन राहण्यात खर्च करतात. जगभरातील लोक मोबाईल आणि डेक्सटॉपवरून किती वेळ सोशल मीडियावर ऑनलाईन असतात.

* किती वेळ ते खर्च करतात या डिजिटल मिनिट्सचा अहवाल कॉमस्कोअरन प्रसिद्ध केला. त्यानुसार भारतीय हे आपल्या एकूण वेळेपैकी ९०% वेळ मोबाईलवरून सोशल साईट्सवर ऍक्टिव्ह असतात.

* भारतीयापाठोपाठ इंडोनेशिया, मेक्सिको, आणि अर्जेंटिनाचा क्रमांक लागतो. या देशातील लोक अनुक्रमे ८७%, ८०%, आणि ७७% मिनिटे मोबाईलवरून ऑनलाईन राहतात.

* मोबाईलच्या झालेल्या कमी किमती आणि स्वस्त डेटा पॅक यामुळे मोबाईलवरून ऑनलाईन असणाऱ्यांची संख्या वाढल्याचं म्हटलं जात आहे.

* एक भारतीय सरासरी ३ हजार मिनिटे मोबाईलवरून ऑनलाईन असतात. तर डेक्सटॉपवरून त्या तुलनेत ते फक्त १ हजार २०० मिनिटेच ऑनलाईन राहण्यास खर्च करतात. असं कॉमस्कोअरन म्हटलं आहे.

* या अहवालानुसार भरतीय युजर्स व्हॉट्स ऍप, गुगल प्ले, युट्युब, जीमेल आणि गुगल सर्चचा सर्वाधिक वापर करतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.