मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १% समांतर आरक्षण - ३ एप्रिल २०१८

राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १% समांतर आरक्षण - ३ एप्रिल २०१८

* राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून १% समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. 

* गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोकऱ्यांसाठी हे आरक्षण लागू असेल. अनाथकन्या अमृता करवंदेच्या निमित्ताने लोकमतला सर्वप्रथम हा विषय समोर आणला आहे. 

* महिला व बाल कल्याण विभागाने जीआर काढून अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १ टक्का आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. 

* बालगृहातील किंवा इतर अनाथ मुलांपैकी महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येणारे अनाथ मुलांपैकी महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्या मुलांसाठीच लागू असेल. 

* ज्या मुलांच्या कागदपत्रावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व ज्यांचे आईवडील, आजीआजोबा, काका काकू, व चूलत भावंडे व इतर नातेवाईक यापैकी कोणाही बाबतीत पुरावा उपलब्द नाही. अशा मुलांनाच अनाथांचे आरक्षण लागू होईल. 

* जर आरक्षित जागेसाठी अनाथ उमदेवार उपलब्द न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता, खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेवर इतर उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.