रविवार, २२ एप्रिल, २०१८

अणवस्त्र क्षेपणास्त्र चाचणीवर उत्तर कोरियाचा पूर्णविराम - २२ एप्रिल २०१८

अणवस्त्र क्षेपणास्त्र चाचणीवर उत्तर कोरियाचा पूर्णविराम - २२ एप्रिल २०१८

* जागतिक कठोर निर्बंधा नंतरही वारंवार अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या घेऊन जगाला वेठीस धरणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने एक स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.

* उत्तर कोरिया यापुढे अणवस्त्र क्षेपणास्त्र चाचण्या घेणार नाही. अशी जोंग ने घोषणा केली. उत्तर कोरियाने आतापर्यंत सहा अणुचाचण्या घेतल्या आहेत. गेल्या वर्षी कोरियाने आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली अणुचाचणीसह एकाच वर्षात तब्बल २० बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल होते.

* उत्तर कोरियाच्या निर्णयाने संपूर्ण जगातून स्वागत होत असताना जपानने मात्र आम्ही असमाधानी असल्याचे म्हटले आहे.

* जरी उत्तर कोरियाने अणवस्त्र क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रम बंद केला असला तरीही आतापर्यंत विकसित केलेल्या उर्वरित अणवस्त्र क्षेपणास्त्र यांचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

* उत्तर कोरिया जोपर्यंत आपल्याकडील सर्व अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र नष्ट करत नाही. तोपर्यंत जपान या देशावर दबाव कायम ठेवणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.