रविवार, ८ एप्रिल, २०१८

जागतिक कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाट - ८ एप्रिल २०१८

जागतिक कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाट - ८ एप्रिल २०१८

* जगातील एक प्रमुख कापूस उत्पादक देश अशी भारताची ओळख असली तरी चांगल्या वाणांचा अभाव, नैसर्गिक अडचणी यामुळे कापूस उत्पादकतेमध्ये मात्र भारत जगाच्या मागेच आहे.

* भारतात हेक्टरी ६०० किलो कापूस उत्पादन गाठणेदेखील अशक्य झाले आहे. कापसाचे जनुकीय बदल घडवून तयार केलेले बीटी बियाणे बीजी-३ वेळीच आत्मसात न केले गेल्यामुळे उत्पादकतेचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे.

* कापसाचे बीटी तंत्रज्ञानातील बीजी १ व २ प्रकारचे तंत्रज्ञान येऊन सुमारे १५ वर्षे झाली आहेत. पण अशा तंत्रज्ञानात दर १० वर्षांनी सुधारणे करणे आवश्यक असते. आपल्या देशात मात्र अशा सुधारणांकडे दुर्लक्ष झाले आहे.

* बीजी-२ तंत्रज्ञान व्यापक प्रमाणात देशभरात पोहोचले तेव्हा त्या पिकांना बोड अळीचा त्रास होत नाही. असे तोंडी दावे करण्यात आले होते. यामुळे कामगंध सापळे व इतर प्रतिबंधक कार्यक्रम शेतकऱ्यांनी स्वीकारले नाहीत.

* रिफ्युजकडेदेखील या काळात दुर्लक्षच झाले. परिणामी गुलाबी बोन्डअळीचा प्रादुर्भाव होऊन कापसाची उत्पादकता हेक्टरी ५७७ किलोपर्यंत घसरली. जनुकीय सुधारीत बियाणांच्या किंवा बीटी तंत्रज्ञानाच्या नव्या वाणांच्या चाचण्यांच्या किमान ५ वर्षाचा कालावधी लागतो.

* अमेरिका व ऑस्ट्रेलियात या तंत्रज्ञानाचा चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. अमेरिकेत तर आता थ्री जीए तंत्रज्ञान आणले आहेत. आता तेथे त्यापुढील तंत्रज्ञानाची तयारी सुरु आहे.


* ऑस्ट्रेलियाने बीजी-४ तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. चीनने आपल्या देशी प्रकारच्या सुमारे ८४ वाणांचे संवर्धन करून तंत्रज्ञानाची सुधारणा केली आहे. चीनने आपल्या देशी प्रकारच्या सुमारे ८४ वाणांचे संवर्धन करून तंत्रज्ञानाची सुधारणा केली.

* भारतात कापूस लागवडीखालील एकूण १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून त्याची हेक्टरी उत्पादकता फक्त ५७७ किलो कापूस अशी आहे.

* चीनमध्ये ४१ लाख हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखालील असून हेक्टरी उत्पादकता १८०० किलो कापूस अशी आहे. तसेच अमेरिकेत केवळ २७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. तेथे दर हेक्टरमागे तब्बल २ हजार किलो कापूस किलो पिकवला जातो.

* ऑस्ट्रलियातही हे प्रमाण १५०० किलो असून, तेथे ११ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.