सोमवार, ९ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारताला सुवर्णपदक - ९ एप्रिल २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारताला सुवर्णपदक - ९ एप्रिल २०१८

* ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असनाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी उल्लेखनीय कामगीरी बजावत अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं आहे.

* सांघिक प्रकारच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी मलेशियाच्या संघावर ३-१ अशा गुणसंख्येने मात केली. मलेशियाच्या संघावर मात करताना भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई इतिहास रचला आहे.

* राष्ट्रकुल स्पर्धांमधील सांघिक बॅडमिंटन प्रकारत भारतीय संघाने पहिल्यांदाच सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाकडून मिश्र दुहेरीमध्ये सात्विक रणकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा, पुरुष एकेरीमध्ये किदांबी श्रीकांत आणि महिला एकेरी सामन्यांमध्ये सायना नेहवाल या खेळाडूच्या कामगिरीमुळे हे यश संपादन करणं सहज शक्य झाल.

* मलेशियाच्या सोनिया चेहला सायनाने पराभूत करत तिसऱ्या गेममध्ये २१-९ अशा फरकाने विजय मिळविला आणि भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.