बुधवार, ११ एप्रिल, २०१८

आयआरएनएसएस - १ आय चे इस्रोद्वारे प्रक्षेपण - ११ एप्रिल २०१८

आयआरएनएसएस - १ आय चे इस्रोद्वारे प्रक्षेपण - ११ एप्रिल २०१८

* भारतीय अंतराळ संशोधन इस्रो जीसॅट -६ ए चे अपयश विसरून नव्या दमाने आयआरएनएसएस - १ आय या दूरसंचार उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या तयारीला लागली आहे.

* या उपग्रहाचे गुरुवारी पहाटे ४ वाजता [पीएसएलव्ही-सी ४१] या भारताच्या अत्यंत विश्वासू अग्निबाणाच्या मदतीने प्रक्षेपण केले जाईल.

* इस्रोने दिलेल्या माहितीनुसार [आयआरएनएसएस-१] आय उपग्रहाचे श्रीहरीकोटा सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून गुरुवारी प्रक्षेपण करण्यात येईल.

* हा उपग्रह 'नाविक' या स्वदेशी 'जीपीएस' यंत्रणेतील आयआरएनएसएस १ ए या नादुरुस्त उपग्रहाची जागा घेईल. प्रस्तुत उपग्रहाचे आण्विक घड्याळ नादुरुस्त उपग्रहाची जागा घेईल.

* नादुरुस्त झाल्यामुळे तो निकामी ठरला आहे. 'नाविक' प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत एकूण ८ आयआरएनएसएस उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेत.

* आता इस्रो पुन्हा १ आय चे प्रक्षेपण करून ही स्वदेशी जीपीएस यंत्रणा पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आयआरएनएसएस - १ आय हा १.४ टन वजनी उपग्रह असून [पीएसएलव्ही] चे ४३ वे उड्डाण आहे.

* दरम्यान इस्रोने नुकतेच जीसॅट - ६ए चे प्रक्षेपण केले होते. मात्र त्याचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क तुटल्यामुळे ही मोहीम अंतराळात फसली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.