मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

रबी ज्वारी

रबी ज्वारी

* सर्वसाधारणपणे हे पीक जमिनीत साठलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. रबी ज्वारीचे फार मोठे क्षेत्र महाराष्ट्र तसेच कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यात आहे.

* जमीन - हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. चांगले पीक ४५ सेमी खोलीच्या निचरा होणाऱ्या जमिनीत येते.

* पूर्वमशागत - हलक्या व मध्यम जमिनी दरवर्षी एकदा, तर भारी जमिनी दर ३ वर्षांनी एकदा नांगरतात, सर्वसाधारणपणे कोरडवाहू पीक घेताना खरिपात ती जमीन मोकळी ठेवतात. त्यामुळे पावसाचे पाणी मुरून राहते. खरिपात जमीन कुळवाच्या तीन वर्षांनी एकदा म्हणजे नांगरटीच्या वर्षी हेक्टरी पाच टन या प्रमाणात शेणखत घातले जाते.

* जाती - एम ३४ १ मालदांडी ही सुधारित जात आहे. तसेच एसपीव्ही ५०४ स्वाती ही अलीकडील जातही चांगली आहे. संकरित प्रकारात सीएएसएच ७ आर व सीएसएच ८ आर या जाती उत्तम गणल्या जातात.

* पेरणी - ४५ सेमी अंतराच्या पाभरीने तिफणीने पेरणी करतात. ३० सेमी अंतराच्या पाभरीने पेरणी केल्यास रोपांची विरळणी करावी लागते.

* खते - हलक्या व मध्यम खोलीच्या ४५ सेमी, जमिनीसाठी हेक्टरी २४ किलो नत्र देतात. मध्यम खोल व खोल जमिनीत प्रतिहेक्टरी ५० किलो नत्र द्यावे लागते. कोरडवाहू ज्वारीस स्फुरद देताना ते दोन-तीन आठवडे अगोदर हेक्टरी २५ किलो या प्रमाणात देणे योग्य ठरते.

* बागायती ज्वारीला दर हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद पालाश याप्रमाणे खताची मात्रा देतात.

* आंतरमशागत - जमिनीत ओल टिकवून ठेवण्यासाठी तीन कोळपण्या आवश्यक असतात. पहिली कोळपणी पीक आठवड्याचे झाल्यावर, दुसरी त्यानंतर १५ दिवसांनी फासाच्या कोळप्याने व त्यानंतर १५ दिवसांनी दातांच्या कोळप्याने करतात.

* पिकावरील रोग - खोडमाशी, खोडकिडा, चिकटा रोग, काणी रोग.

* उत्पन्न - उथळ व मध्यम जिरायत जमिनीत हेक्टरी ३ ते ८ क्विंटल. उथळ व मध्यम बागायती जमिनीत २० ते ३० क्विंटल तर माध्यम ते भारी जिरायत जमिनीत १२ ते १५ क्विंटल होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.