शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

महाराष्ट्रातील प्रमुख घोटाळेबाज व गुन्हेगार - २६ एप्रिल २०१८

महाराष्ट्रातील प्रमुख घोटाळेबाज व गुन्हेगार - २६ एप्रिल २०१८

* छगन भुजबळ - मुक्काम - आर्थर रोड जेल, आरोप - बेहिशेबी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग, मार्च २०१५ पासून जेलमध्ये, भुजबळांची लाइफस्टाइल पहिली तर त्यांच्याकडे तर त्यांच्याकडे आता पाहवत नाही. कुठे त्यांचा नाशिकमधील महाल आणि कुठे आर्थर रोडमधला जेल.

* समीर भुजबळ - मुक्काम - आर्थर रोड जेल, आरोप - बेहिशेबी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रींग, फेब्रुवारी २०१६ पासून जेलमध्ये, काकांप्रमाणेच पुतण्याचा थाटही वेगळाच. नाशिकमध्ये चर्चा तर अशी आहे, की समीर भाऊच फक्त पान आणण्यासाठी हेलिकॉप्टर हे मुंबई ते नाशिक भरारी घ्यायचं. पण आता ना पान ना मान फक्त जेलमधलं तापमान.

* रमेश कदम - मुक्काम - आर्थर रोड, आरोप - अण्णाभाऊ साठे महामंडळात गैरव्यवहार, रमेश कदमच्या गाड्या हा अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय असायचा. त्याचा पेहराव त्याचा गॉगल आणि रुबाब काही औरच.
गाडी पांढरी, कपडे पांढरे, इतकं काय जोडेही पांढरे, पण आता जेलमधल्या गरम हवेन डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.

* इंद्राणी मुखर्जी - मुक्कम पोस्ट - भायखळा जेल, आरोप - शीना बोराची हत्या - ऑगस्ट २०१५ पासून जेलमध्ये, दीड वर्षांपूर्वीच्या हत्येला वाचा फुटली आणि एकेकाळी पेज थ्रीवर असणारी इंद्राणी मुखर्जी पेज वन वर आली. सेलिब्रेटी पार्टीमध्ये मश्गुल असणारी इंद्राणी जेव्हा पहिल्यांदा जेलमधून बाहेर पडली तेव्हा विश्वास बसला नाही.

* अरुण गवळी - मुक्काम - नागपूर जेल, आरोप - कमलाकर जामसंडे हत्या प्रकरण दोषी, एकेकाळी ज्यांच्या आवाजानं मुंबई हादरायची, तो आज मुंबईपासून ८०० किलोमीटरवर खितपत पडला आहे.

* डी. एस. कुलकर्णी - मुक्काम पोस्ट - येरवडा कारागृह पुणे, आरोप - गुंतवणूकदारांचे पैसे थकवणे, पुणेकरांना ज्यांनी ड्रीम सिटीच दाखवलं,  ज्यांनी अनेकांच्या घराला घरपण दिलं. तेच आता १० बाय १० च्या कोठडीमध्ये खितपत पडले आहे.

* भाऊसाहेब चव्हाण - मुक्काम पोस्ट - नाशिक सेंट्रल जेल, आरोप गुंतवणूकदारांना गंडा घालणे, मे २०१६ पासून जेलमध्ये, ज्याला आयुष्यात हॉंगकॉंग हा शब्द उच्चारता आला नाही. तो महाभाग गुंतवणूकदारांना म्हणे वर्ल्ड टूर करवणार होता. वाट्टेल त्या थापा मारण्यात भाऊसाहेबांचा हात कुणी धरायचा नाही.

* महेश मोतेवार - मुक्काम पोस्ट - ओदिशा जेल, आरोप - गुंतवणूकदारांना गंडा घालणे, डिसेंबर २०१५ पासून जेलमध्ये. समृद्ध जीवन चीटफंडमधून मोतेवारने गुंतवणूकदारांना भुलवलं. बक्कळ माया गोळा केली.  पण जेव्हा परताव्याची वेळ आली तेव्हा हात वर केले आणि समृद्ध जीवन जगणारा मोतेवार थेट जेलमध्ये आला.

* पीटर मुखर्जी - मुक्कम - नागपूर जेल, आरोप - कमलाकर जामसांडे हत्या प्रकरणात दोषी, डिसेंबर २०१५ पासून जेलमध्ये. मोठमोठ्या बिझनेस मिटींग्स. मीडिया कॉन्फरन्स मध्ये मश्गुल असलेला माणूस. आज जेलमध्ये अडकला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.