शनिवार, १४ एप्रिल, २०१८

राज्यात बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना - १४ एप्रिल २०१८

राज्यात बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना -  १४ एप्रिल २०१८

* भारतीय सैन्यातील आणि सुरक्षा बलातील शहिद जवानांच्या पत्नीला सन्मान योजनेच्या अंतर्गत आगामी १ मे २०१८ पासून ही योजना राबविण्याचे निर्देश ११ एप्रिल रोजी राज्यात देण्यात आले आहे.

* भारतीय सैन्य आणि सुरक्षा बलातील जवानांना देश संरक्षणासाठी हौतात्म्य प्राप्त होते. शाहिद झालेल्या जवानास आणि त्यांच्या परिवाराचा कालांतराने समाजाला विसर पडतो.

* अशा जवानांची आठवण समाजात कायम तेवत राहावी तसेच शहिद जवानांच्या पत्नीला सन्मान देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने ही सेवा सुरु केली आहे.

* ही योजना राबविण्यासाठी अध्यादेश काढला गेला असून, महामंडळाचे राज्य महाव्यवस्थापक वाहतूक यांनी प्रत्येक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अधिकृत यादी मिळवून ओळखपत्र तयार करण्याचे संबंधित आगार प्रमुखांना आदेश दिले आहेत.

* शाहिद जवान व त्याच्या वीर पत्नीचे छायाचित्र प्राप्त करून ओळखपत्राच्या पासेस जवानांच्या घरी भेट देत सन्मानाने पोहोचविण्याचे कळविले आहे.

* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व सर्व विभाग नियंत्रकांना ही योजना काटेकोरपणे राबविण्याचे आदेश आले. असून  प्रत्येक आगार प्रमुखांकडे या आदेशाची प्रत पाठविली गेली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.