सोमवार, २ एप्रिल, २०१८

१४. वर्तुळ

१४. वर्तुळ

* त्रिज्या - वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.

* वर्तुळाचा व्यास (D) - केंद्रबिंदूतून निघून जाणाऱ्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाचा व्यास असे म्हणतात.

* वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या (Rच्या) दुप्पट असतो.

* जीवा - वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जिवा म्हणतात. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.

* वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येचा दुप्पट व परिघाच्या ७/२२ पट असतो. वर्तुळाचा परीघ हा त्रिज्येच्या ४४/७ पट व व्यासाच्या २२/७ पट असतो.

* वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक - २२/७ D-D = १५/७ D.

* अर्धवर्तुळाची परिमिती = ११/७ D+D(D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) ×३६/७.

* अर्धवर्तुळाची त्रिज्या - परिमिती × ७/३६.

* वर्तुळाचे क्षेत्रफळ = π×(त्रिज्या)२ = πr२ ( π=२२/७ अथवा ३.१४)

* वर्तुळाची त्रिज्या = वर्गमूळात क्षेत्रफळ×७/२२

* वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास)×७/३०

* अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r२/२ किंवा ११/७×r२

* अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती×७/३६

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.