सोमवार, २ एप्रिल, २०१८

डॉ रॉबर्ट लॅगलॅंड्स यांना आबेल पुरस्कार जाहीर - २ एप्रिल २०१८

डॉ रॉबर्ट लॅगलॅंड्स यांना आबेल पुरस्कार जाहीर - २ एप्रिल २०१८

* प्रसिद्ध गणितज्ञ डॉ रॉबर्ट लॅगलॅंड्स यांना गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार नुकताच मिळाला आहे.

* कॅनडाचे नागरिक असलेल्या लॅगलॅंड्स यांना प्रोग्रॅम या नावाने गणितात प्रसिद्ध असलेल्या संशोधनासाठी देण्यात आला आहे.

* आधुनिक गणितात इतक्या मोठ्या प्रमाणात फलनिष्पक्ती असलेले कुठलेही गणिती संशोधन सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यांचा हा प्रकल्प गणितातील महाएकात्मिक सिद्धांत मानला जातो.

* गेल्या ५० वर्षातील एक उत्तम गणितज्ञ असा त्यांचा गौरव आबेल पुरस्कार निवड समितीने केला आहे. लॅगलॅंड्स प्रोग्रॅमव्यतिरिक्त क्लास थिअरी ऑटोमोर्फिक फॉर्म व नंबर थिअरी यात त्यांनी  बरेच काम केले आहे.

* सध्या ते प्रिन्स्टनमध्ये इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हान्स्ड स्टडी या संस्थेत मानद प्राध्यापक आहेत. याच कार्यालयात आईन्स्टाईन यांनीदेखील गणितज्ञ म्हणून काम केले आहे.

* येल विद्यापीठात असताना त्यांनी [प्रॉब्लेम्स इन थिअरी ऑफ ऑटोमॉर्फिक फॉर्म्स] हे पुस्तकही लिहिले आहे. आतापर्यंत त्यांना वुल्फ, स्टीली, नेमर्स, शॉ यांच्या नावाने दिले जाणारे गणितातील सर्व मोठे पुरस्कार मिळाले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.