गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

देशात पायाभूत प्रकल्प उभारणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर - ५ एप्रिल २०१८

देशात पायाभूत प्रकल्प उभारणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर - ५ एप्रिल २०१८

* पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. गेल्या ४ वर्षात राज्यात २८४ पायाभूत प्रकल्प मंजूर झाले आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत १ लाख ४३ हजार ७३६ कोटी इतकी आहे.

* केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची ३१ मार्च २०१८ अखेर पर्यंतची माहिती जाहीर केली आहे.

* या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प व शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. यात ५ ते ५० कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत प्रकल्पाचा समावेश आहे.

* केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाने सन १९९० पासूनच्या देशातील पायाभूत प्रकल्पांची माहिती संकेतस्थळानुसार प्रसिद्ध केली आहे. गेल्या २८ वर्षात देशात ५४ लाख ६५ हजार कोटी किमतीचे ९०६८ पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले.

* या तुलनेत महाराष्ट्रात ६ लाख १९ हजार कोटीचे ११४४ पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे हातात घेण्यात आली आहे.

* महाराष्ट्र पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अव्वल ठरले असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. या राज्यात ३ लाख ४३ हजार कोटींचे ५४४ प्रकल्प हाती घेण्यात आले.

* गोवा हे राज्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसऱ्या स्थानावर आहे. या राज्यात ३ लाख २५ हजार कोटी किमतीचे ४६ प्रकल्प हाती घेण्यात आले.

* अरुणाचल प्रदेश चौथ्या स्थानावर तर आंध्रप्रदेश क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे. राज्यात गेल्या ४ वर्षात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

* सन २०१४ ते २०१८ या ४ वर्षात १ लाख ४३ लाख ४३ हजार ७३६ कोटी किमतीचे २८४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.