सोमवार, २३ एप्रिल, २०१८

टीसीएस बनणार भारताची पहिली बिलियन डॉलर कंपनी - २३ एप्रिल २०१८

टीसीएस बनणार भारताची पहिली बिलियन डॉलर कंपनी - २३ एप्रिल २०१८

* भारताला लवकरच पहिली १०० बिलियन डॉलर कंपनी मिळणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ही आता पहिली १०० बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार आहे.

* टीसीएस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे भागभांडवल लवकरच १०० बिलियन डॉलरवर पोचण्याची शक्यता आहे. कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे ६३४,१५५.६२ कोटी रुपये आहे.

* टीसीएसही पहिली भारतीय कंपनी आता १०० बिलियन डॉलरच्या पंक्तीत येणार आहे. टीसीएसच्या शेअरच्या किमतीत ६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल २०१२ नंतरची ती सर्वात मोठी वाढ आहे.

* टीसीएसच्या एका शेअरने आज ३४२१ रुपयांची उचचांकी पातळी गाठली आहे. टीसीएसने चौथ्या तिमाही निकालांची घोषणा केली त्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली.

* तसेच टाटा समूहाच्या अत्यंत महत्वाच्या टीसीएसने एकास एक बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये यात गुंतवणूक करण्याचा उत्साह दिसून आला.

* सद्यस्थितीत टीसीएसचे बाजारमूल्य जवळपास ९९ बिलियन डॉलर्सच्या आसपास पोचले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.