रविवार, १ एप्रिल, २०१८

राज्यातील ५७ तालुक्यांना मिळणार आदिवासी क्षेत्राचा दर्जा - १ एप्रिल २०१८

राज्यातील ५७ तालुक्यांना मिळणार आदिवासी क्षेत्राचा दर्जा - १ एप्रिल २०१८

* राज्यात ज्या जिल्ह्यांचा मानव निर्देशांक ०.६७१ पेक्षा कमी असून त्या क्षेत्रात आदिवासी, नक्षलग्रस्त भाग नसला तरी त्या तालुक्यात जंगलाचे प्रमाण अधिक आहे, अशा ५७ तालुक्यांना प्रमाण अधिक आहे.

* अशा ५७ तालुक्यांना आदिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची शिफारस अनुपकुमार समितीकडे शासनाकडे सादर केली आहे.

* आदिवासी व नक्षलग्रस्त तालुक्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शासनाकडे नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याची समिती नेमली होती.

* या समितीने आदिवासी क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची वस्तुस्थिती आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा सूक्ष्म अभ्यास केला.

* त्यानंतर समितीने राज्यातील ५७ तालुके असे शोधून काढले की हे तालुके आतापर्यंत आदिवासी, नक्षलग्रस्त भाग नव्हते. या तालुक्यातील दळणवळणाची साधने आणि जंगलव्याप्त गावांचा विचार करून अशा तालुक्यांना नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भागाप्रमाणे शासनाने नियम लागू केले.

* [अ वर्गीय तालुके] - गडचिरोली - एटापल्ली, भामरागड, सिंरोचा, अहेरी, मूलचेरा, कोरची, चार्मोशी, गोंदिया - सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, चंद्रपूर - जिवती, कोरपना, गोंडपिपरी. नंदुरबार - अक्राणी, अक्कलकुवा, तळोदा. पालघर - जुन्नर, मोरवाडा, पाडा. यवतमाळ - झरी, जामणी. अमरावती - चिखलदरा, धारणी. नांदेड - किनवट.

* [ब वर्गीय तालुके - गडचिरोली - धानोरा, बुरखेडा, वडसा, आरमोरी. यवतमाळ - पांढरकवडा, उमरखेड, मारेगाव. गोंदिया - आमगाव, सडकअर्जुनी. भंडारा - सावराकुंड, तुमसर. जळगाव - यावल. अहमदनगर - अकोले. चंद्रपूर - चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, पोंभुर्णा, वसवली. नाशिक - कळवण, सुरगना, बासगाव पेठ, दिंडोरी. नागपूर - रामटेक, पारशिवनी. रायगड - कर्जत. पालघर - विक्रमगड, डहाणू.  ठाणे - मुरबाड, आंबेगाव.  धुळे - साक्री, शिरपूर. नंदुरबार - शहादा, नवापूर. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.