रविवार, १ एप्रिल, २०१८

रशियाकडून 'शैतान-२' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - १ एप्रिल २०१८

रशियाकडून 'शैतान-२' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - १ एप्रिल २०१८

* अमेरिकेच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियन लष्कराने शुक्रवारी 'सरमत' नामक एका नव्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

* शत्रूवर ध्वनीहून २० पट जास्त वेगाने हल्ला करणारे हे क्षेपणास्त्र सोव्हीएत युनियनच्या काळात विकसित करण्यात आलेल्या तथा पाश्चिमात्य राष्ट्रात 'शैतान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वोयेवोदा क्षेपणास्त्राची जागा घेणार आहे.

* २०० टन वजनी आरएस-२८ सरमत चा पल्ला वोयेवोदा हुन जास्त आहे. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी तब्बल २४ अणवस्त्रे आपल्या भात्यात घेऊन शत्रूवर हल्ला चढवू शकते.

* पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर या दोन्ही ध्रुवावरून उड्डाण करण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला चकवा देण्यातही निपुण आहे.

* तसेच पृथ्वीच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी लपलेल्या आपल्या शत्रूचा माग काढून त्यावर हल्ला करण्यात ते तरबेज आहे. सद्यस्थितीत [वोयेवोदा] हे जगातील सर्वात ताकदवान आंतरखंडीय क्षेपणास्त्र [आयसीबीएम] मानले जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.