रविवार, ११ मार्च, २०१८

भारताला ISA आंतरराष्ट्रीय पहिल्या परिषदेचे यजमानपद - ११ मार्च २०१८

भारताला ISA आंतरराष्ट्रीय पहिल्या परिषदेचे यजमानपद - ११ मार्च २०१८

* इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही जागतिक स्तरावरील शासनामार्फत चालविली जाणारी संघटना असून तिचे मुख्यालय गुरुग्राम भारतात आहे.

* या संस्थेची सुरुवात सर्वप्रथम भारत आणि फ्रांस यांच्या हस्ते करण्यात ३० नोव्हेंबर २०१५ साली पॅरिस मध्ये करण्यात आली. त्यानंतर २५ जानेवारी २०१६ साली ग्वालपहाडी गुडगाव या ठिकाणी या ISA चे जागतिक मुख्यालय निर्माण करण्यात आले.

* उष्ण कटिबंधीय क्षेत्रात किंवा अंशतः समाविष्ट असलेल्या संपन्न अशा देशांचे सौर ऊर्जा स्रोत हे एकत्रीकरण आहे. या पुढाकारामुळे सदस्य देश सौर ऊर्जेच्या वापरासाठी असलेल्या प्रमुख आव्हानाचा सौर हे एकत्रितकरण आहे.

* राजधानीतील राष्ट्रपती भवनात रविवारी पार पडणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी शिखर परिषदेत २३ देशांचे राष्ट्रध्यक्ष आणि विविध देशांचे १० मंत्रीस्तरीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

* भारत व फ्रान्सकडे या सोहळ्याचे संयुक्त यजमानपद असणार आहे. वैश्विक ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे मत संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरण प्रमुख एरिक सोलहेम यांनी व्यक्त केले.

* आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अर्थात आयएसए ही सौर उर्जेला चालना देणारी १२१ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सौर ऊर्जेसाठी जागतिक खरेदीदारांचा क्लब तयार करून तसेच वेगाने याचा वापर वाढविण्यासाठी आयएसएकडून मदत केली जाऊ शकते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.