मंगळवार, २० मार्च, २०१८

विशेष चालू घडामोडी - २० मार्च २०१८

विशेष चालू घडामोडी - २० मार्च २०१८

* भारतात ज्या एफ-१६ फायटर विमानाची निर्मिती होईल त्यामध्ये काही खास वैशिट्ये असतील असे अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने म्हटले आहे. 

* भारतीय क्रिकेट संघाने कोलंबो श्रीलंका येथे त्रिकोणीय टी-२० शृंखलेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला हरवून 'निडाहास करंडक २०१८' जिंकला. 

* केरळच्या कोची शहरात २२-२३ मार्च २०१८ रोजी वैश्विक डिजिटल शिखर परिषद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

* टाटा सन्स  उद्योग समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची २०१८ ते २०२१ या कालखंडासाठी 'भारतीय विज्ञान संस्था' 'IISc' च्या सर्वोच्च न्यायिक मंडळाचे 'IISc' अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 

* नीती आयोगाने शालेय शिक्षणात प्रशासकीय बदल घडवून आणण्याकरिता १७ मार्च २०१८ रोजी 'मानव संपदा शिक्षणात बदलण्यासाठी शाश्वत कृती' [Sustainable Action for Transforming Human Capital in Education - SATH-E साथ-ई] नावाने एक नवा उपक्रम प्रस्तुत केला आहे. 

* राज्यात प्लास्टिक आणि थर्माकॉलपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत केली. 

* सुप्रसिद्ध मल्याळम लेखक एम. सुकुमारन यांचे १६ मार्च  २०१८ रोजी निधन झाले आहे. ते ७६ वर्षाचे होते. 

* हिसार येथे केंद्रीय म्हैस संशोधन [Central Institute for Research on Buffalos - CIRB] येथील भारतीय शास्त्रज्ञानी क्लोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच आसामी जातीची म्हैस जन्माला आणण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. 

* चीनच्या संशोधकांनी रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करून एक कुत्रिम हृदय विकसित केले आहे. याचा पशुवरील प्रयोग यशस्वी ठरला आहे. 

* जगातील सर्वात वेगवान लेसरची निर्मिती करणाऱ्या लेसर तंत्रज्ञ प्रा मार्गारेट मुरनन यांना आयर्लंडचे सेंट पॅट्रिक विज्ञान पदक प्रदान करण्यात आले. 

* विस्डेन इंडिया अल्मनॅकच्या सहाव्या आवृत्तीमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भारताच्या लोकेश राहुलची निवड करण्यात आली. 

* प्रख्यात मराठी लेखिका आशा बगे यांना प्रथमच दिला जाणारा 'प्रा राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* आपल्या अभिनयाने आणि सौदर्यांने करोडो प्रेक्षकांना भुरळ घालणारी दीपिका पदुकोण ही अभिनेत्री आता इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटची राणी ठरली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.