मंगळवार, १३ मार्च, २०१८

भारतीय अर्थव्यवस्था जीएसटी आणि नोटबंदीतून बाहेर [आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल] - १३ मार्च २०१८

भारतीय अर्थव्यवस्था जीएसटी आणि नोटबंदीतून बाहेर [आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल] - १३ मार्च २०१८

* भारतीय अर्थव्यवस्था वस्तू आणि सेवा कर [जीएसटी] अंमलबजावणी तसेच नोटबंदीच्या अनिष्ट परिणामातून सावरत असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले.

* मात्र शिक्षण, आरोग्य, व बँकिंग, कार्यक्षमता या क्षेत्रात सुधारणा अपेक्षित असल्याचेही नमूद केले. अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढते आहे.

* त्याला कारण स्थूल आर्थिक धोरणातील बदल आहे. पुरवठ्याच्या बाजूने असलेले अडथळे दूर झाले. रचनात्मक सुधारणा राबविण्यात आल्या आहेत.

* वस्तू आणि सेवा कर तसेच नोटबंदी यामुळे आर्थिक वाढ खुंटली आहे. ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अलीकडच्या तिमाहीत आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता.

* त्यामुळे भारताने पुन्हा वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थेचा फटका बसला. पण आता अर्थव्यवस्था त्यातूनही सावरत आहे. नवीन जीएसटीचा फायदाचा होईल.

* भारताचा अर्थसंकल्प हा आयात शुल्क वाढविणारा म्हणजे संकुचित संरक्षणवादी असल्याची टीका होत आहे. त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की वाढीव आयात व शुल्कामुळे उत्पादन, रोजगार, व गुंतवणूक यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

* आरोग्य, शिक्षण, खासगी, व सार्वजनिक गुंतवणुक यात सुधारणा अपेक्षित असून बँकिंग यंत्रणांची कार्यक्षमता वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताला सर्वसमावेशक व शाश्वत अशी आर्थिक वाढ भारताला गाठता येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.