शनिवार, २४ मार्च, २०१८

राज्यसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष - २४ मार्च २०१८

राज्यसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष - २४ मार्च २०१८

* राज्यसभेच्या २६ जागांसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक १२ जागा जिंकून भाजपने इतिहास रचला आहे.

* पक्षाच्या स्थापनेनंतर ३८ वर्षात पहिल्यांदाच भाजपा हा राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

* परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमतापासून दूर आहे. राज्यसभेत आता भाजपचे ६९ खासदार आहेत. तर काँग्रेस सदस्यांची संख्या ५० आहे.

* एकूण २४५ सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी १२६ चा आकडा गाठणे आवश्यक आहे. मात्र रालोआच्या सदस्यांची एकत्रित संख्या त्यापेक्षा कमी आहे.

* २३ मार्च रोजी ७ राज्यामध्ये राज्यसभेच्या २५ जागांसाठी मतदान झाले. भाजपाला १२, काँग्रेसला ५, तृणमूल काँग्रेसला ४, तेलंगणा राष्ट्र समितीला ३, जदयुला १ जागा मिळाल्या.

* यावर्षात राज्यसभेच्या १७ राज्यामधील ५९ जागा रिक्त झाल्या. त्यातील ३३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यापैकी १६ जण भाजपचे होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.