रविवार, ४ मार्च, २०१८

भारताचे व्हिएतनामशी तीन करार - ४ मार्च २०१८

भारताचे व्हिएतनामशी तीन करार - ४ मार्च २०१८

* आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धी, कृषी संशोधन क्षेत्र सहकार्य विस्तार आणि आण्विक ऊर्जेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक सहकार्य विस्तार आणि आण्विक ऊर्जेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक सहकार्य करण्याबाबतच्या करारावर आज भारत व व्हिएतनाम दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या.

* आसियान राष्ट्रसमूह आणि आग्नेय आशियातील एक भरवशाचे मित्र राष्ट्र म्हणून व्हिएतनामचे महत्व आहे. चीनच्या संदर्भातदेखील भारत आणि व्हिएतनाम महत्व आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान दाई क्वॉन्ग यांच्यात शिष्टमंडळ पातळीवर वाटाघाटी करण्यात आल्या आणि त्यांच्या उपस्थितीत तीन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

* आर्थिक आणि व्यापारविषयक संबंधांना प्रोत्साहन व त्यांचा विस्तार करण्याबाबत मार्गदर्शक चौकट ठरविण्यासाठी एक करार केला. ग्लोबल सेंटर फॉर न्यूक्लिअर एनर्जी इंडिया आणि व्हिएतनाम ऍटॉमिक एनर्जी इन्स्टिट्यूट यांच्या दरम्यान करार करण्यात आला.

* यामध्ये शांततापूर्ण मार्गाने आण्विक ऊर्जेच्या उपयोगासंबंधीच्या तंत्रज्ञानविषयक सहकार्याचा समावेश आहे. तिसऱ्या करारात भारतीय कृषी संशोधन परिषद आणि व्हिएतनामच्या कृषी मंत्रालयादरम्यान करार करण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.