शुक्रवार, २३ मार्च, २०१८

फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना अटक - २२ मार्च २०१८

फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना अटक - २२ मार्च २०१८

* फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना २००७ मध्ये निवडणूक प्रचारासाठी लिबियाकडून आर्थिक मदत मिळाल्याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. 

* सार्कोझी आणि त्यांच्या मंत्र्यांना निवडणूक प्रचारासाठी लिबियाचा नेता मौमर कदाफी आणि त्याचा मुलगा सैफ अल-इस्लाम यांनी पैसे पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

* कदाफीची राजवट उलथवण्यासाठी अमेरिकन लष्कराच्या मदतीला फ्रान्सने जाऊ नये या उद्देशाने हा पैसा देण्यात आला होता. २०१३ मध्ये याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला. 

* या प्रकरणी तपास यंत्रणांनी पाठविलेल्या नोटिसींना सार्कोझी यांनी आतापर्यंत भीक घातली नव्हती. 

* सार्कोझी यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेले तत्कालीन मंत्री ब्रिस हॉर्टफेक्स यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.