बुधवार, ७ मार्च, २०१८

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकर आणि ओमप्रकाशला सुवर्णपदक - ७ मार्च २०१८

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकर आणि ओमप्रकाशला सुवर्णपदक - ७ मार्च २०१८

* झज्जरच्या हरियाणा १६ वर्षीय मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओमप्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर करून आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खळखळ उडवून दिली.

* सोमवारी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध साधला होता. मेक्सिको येथील गुवादालाजारा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अकरावीत शिक्षण घेत असलेल्या मनूने आपल्या पदार्पणातच वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाचा डबल धमाका केला.

* भारतासाठी नंबर वन झालेल्या मनू आणि ओमप्रकाश जोडीने पात्रता फेरीमध्ये ७७० गुण संपादन केले. यासह ते जर्मनीच्या ख्रिस्टियन आणि सॅन्ड्रा रेटझ या पती पत्नी जोडीच्या मागेच राहिले ज्यांनी विश्वविक्रमी ७७७ गुणांसह अंतिम फेरीत मनू आणि ओम प्रकाशने ४७६.२१ गुणांचे सर्वाधिक लक्ष्य साधून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.

* भारताच्या नेमबाजीच्या इतिहासात सर्वात कमी वयात १६ वर्षे सुवर्णपदकाचा दुहेरी धमाका करणारी मनू पहिली नेमबाज ठरली आहे. या कामगिरीमुळे मनू ऑक्टोबरमध्ये ब्यूनस येथे होणाऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली पहिली युवा नेमबाज आहे.

* दुसरीकडे दीपक कुमार आणि मेहुल घोष या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी करताना १० मीटर रायफल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.