सोमवार, २६ मार्च, २०१८

अमेरिकेकडून चीनच्या आयातीवर भरमसाठ आयातशुल्क - २५ मार्च २०१८

अमेरिकेकडून चीनच्या आयातीवर भरमसाठ आयातशुल्क - २५ मार्च २०१८

* अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूवर ६० अब्जडॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे दोन्ही देशात व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. 

* चीनने बेकायदेशीर मार्गानी अमेरिकी मार्गानी अमेरिकी बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे. 

* चीनसोबतच्या व्यापारी तुटीमुळे अमेरिकेला २ दशलक्ष रोजगार गमवावे लागले आहेत. अशी माहिती देत व्हाईट हाऊसने या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.  

* अमेरिकेने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीनही अमेरिकी वस्तूवर वाढीव आयात शुल्क लावणार आहे. 

* या व्यापार युद्धामुळे बाजारातील आर्थिक तरलता धोक्यात येत आहे. यामुळेच विदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारातून पैसा काढून घेण्याची शक्यता आहे. 

* आयात शुल्क वाढीच्या कारवाईतून अमेरिकेने युरोपीय देश, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण कोरिया अशा काही देशांना वगळले आहे. 

* याआधी अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको या शेजारी देशांनाही शुल्कवाढीतून दिलासा दिला होता. अमेरिकेने आयातीवर लावलेल्या करांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.