सोमवार, ५ मार्च, २०१८

मेक्सिको विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत शाहजारचे सुवर्णपदक - ५ मार्च २०१८

मेक्सिको विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत शाहजारचे सुवर्णपदक - ५ मार्च २०१८

* शाहजार रिझविने भारताचे मेक्सिको विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. याच प्रकारात जितूने ब्राँझपदक जिंकले.

* शाहजारप्रमाणेच विश्वकरंडकमध्ये पदार्पण करणाऱ्या मेहूली घोषने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझ जिंकताना जागतिक विक्रमाइतकी कामगिरी केली.

* शाहजारने ग्वादालाजारा येथे सुरु झालेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली. जागतिक कुमार स्पर्धेतील ९ वे स्थान हीच यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी असलेल्या शाहजारने अंतिम फेरीत २४२ गुणांचा विश्वविक्रमी वेध घेतला.

* भारताचा स्टार नेमबाज जितू रॉयने ब्रॉन्झ पदक जिंकले. तर मेहूली घोषने पदार्पणातच ब्राँझ पदक जिंकले. भारताने पहिल्या दिवशी एका सुवर्णपदकासह सर्वाधिक तीन पदके जिंकत पदक तक्त्यात आघाडी घेतली आहे.

* भारतापाठोपाठ रूमानियाने केवळ एकच सुवर्णपदक जिंकत दुसरा क्रमांक मिळविला. चीन आणि जर्मनी प्रत्येकी एका रौप्यपदकासह तिसरे आणि चौथे क्रमांक आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.