शुक्रवार, ९ मार्च, २०१८

भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत २०% कमी वेतन - ९ मार्च २०१८

भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत २०% कमी वेतन - ९ मार्च २०१८

* ताज्या मॉन्स्टर वेतन निर्देशांकानुसार ही माहिती देण्यात आली की भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत २०% कमी वेतन कमी दिले जाते. अशी माहिती या सर्वेक्षणात आढळून आले.

* या अहवालात भारतात पुरुषांना सरासरी ताशी २३१ रुपये वेतन मिळते. महिलांना मात्र ताशी सरासरी १८४.८ रुपयेच मिळतात. महिला आणि पुरुषांच्या वेतनात आजही २०% तफावत आहे.

* वार्षिक आधारावर महिला आणि पुरुष तफावत ५% कमी झाली आहे. ही एकच समाधानाची बाब आहे. २०१६ मध्ये महिला व पुरुषातील वेतन तफावत २४.०८ टक्के होती.

* कामाचा अनुभव वाढत जातो तशी तफावत वाढत जाते ० ते २ वर्षाचा अनुभव असलेल्या पुरुषांना महिलांच्या तुलनेत ७.८% अधिक वेतन मिळते.

* ६ ते १० वर्ष अनुभव असलेल्या पुरुषांना महिलांपेक्षा १५.३ टक्के अधिक वेतन मिळते. ११ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असलेल्या पुरुषांना महिलांपेक्षा तब्बल २५% अधिक वेतन मिळते.

* ३ ते ५ वर्षाच्या अनुभवाच्या बाबतीत मात्र थोडासा उलटा कल दिसून आला. या टप्प्यात महिलांना पुरुषापेक्षा जास्त वेतन मिळते.

* या सर्वेक्षणात ५,५०० कर्मचारी महिला/पुरुषांची मते त्यात जाणून घेण्यात आली आहेत. संस्थांमध्ये लैंगिक समानता आवश्यक आहे. असे मत ६९% उत्तरदात्यांची त्यात व्यक्त केले आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.