सोमवार, ५ मार्च, २०१८

भारतात बँक खाती ८०% आधार कार्डशी संलग्न - ५ मार्च २०१८

भारतात बँक खाती ८०% आधार कार्डशी संलग्न - ५ मार्च २०१८

* आधार जोडणीची मुदत ३१ मार्चला संपत असून आतापर्यंत सुमारे ८०% बँक खाती आणि ६०% मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्यात आले आहेत. अशी माहिती राष्ट्रीय नागरिक प्राधिकरनाच्या सूत्रांनी दिली.

* सरकारने प्रत्येक बँक खाते आधारशी जोडण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते.

* याचबरोबर सर्व क्रमांकही ३१ मार्चपर्यंत आधारशी जोडणे बंधनकारक आहे. तसेच पॅन क्रमांकही आधारशी जोडण्याची सक्ती करण्यात आली आहे.

* माहितीनुसार देशभरात १०९.९ कोटी बँक खाती आहेत. यातील ८७ कोटी बँक खाती आधारशी जोडण्यात आली आहेत. यातील ५८ कोटी खात्यांची जोडणी पूर्ण झाली आहे.

* देशभरात १४२ कोटी मोबाईल क्रमांक असून यातील ८५.७ कोटी मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्यात आले आहेत. देशभरात १.२ अब्ज नागरिकांनी आधार नोदंणी केलेली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.