मंगळवार, १३ मार्च, २०१८

विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला ४ सुवर्ण - १३ मार्च २०१८

विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला ४ सुवर्ण - १३ मार्च २०१८

* मेक्सिको येथे सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतीय नेमबाजांनी केली. यापूर्वी भारताने २००९ च्या चार स्पर्धा मिळून ७ पदके जिंकले. हीच सर्वोत्तम कामगीरी होती.

* भारताने सर्वाधिक १५ पैकी ४ सुवर्णपदके, अमेरिका ३, चीन २, फ्रांस १, रूमानिया १ अशी सुवर्णपदके जिंकली. तर भारताने या स्पर्धेत एकूण ९ पदके, अमेरिका ६ पदके, चीन ५ पदके, फ्रांस ५ पदके, रूमानिया २ पदके जिंकली.

* भारताच्या रिझवी, मनू भाकर, अखिल शेरॉन, ओम प्रकाश मिथरवाल, अंजुम मौदगील, मेहूली घोष, या नवोदितांनी भारताची शान उंचावली, त्याचबरोबर जितू रॉय, रवी कुमारने प्रभावी कामगीरी केली तर संजीव राजपूतने पदक थोडक्यात हुकले.

* दरवर्षी चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, भारताने विश्वकरंडक नेमबाजीतील पहिले पदक १९९७ मध्ये जिंकले. भारताने या स्पर्धेतील पाहिले सुवर्णपदक २००३ मध्ये जिंकले.

* भारताने ४ वेळा एका वर्षात दोन सुवर्णपदके जिंकली. गतवर्षी भारताने चार स्पर्धात मिळून सहा पदके जिंकली होती. त्यात दोन सुवर्णपदके यंदाच्या एकाच स्पर्धात चार सुवर्णपदके. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.