मंगळवार, २७ मार्च, २०१८

२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार - २७ मार्च २०१८

२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार - २७ मार्च २०१८

* भारतीय अर्थव्यवस्था साल २०२५ पर्यंत दुपटीने वाढून ५००० अब्ज डॉलरची होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

* तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या महागाई उद्दिष्टाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचाही विश्वास केंद्रीय अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

* केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव सुभाष गर्ग यांनी म्हटले आहे की आपला देश आता ७ ते ८ टक्के दराने विकास साधण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

* स्टार्टअप एमएसएमई तसेच पायाभूत सुविधा यातील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत केल्यास अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखी वाढू शकेल.

* सुभाषचंद्र गर्ग यांनी सीआयआय उद्योगसंघटनेच्या जागतिक संमेलनास उद्देशून बोलताना ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की आपली अर्थव्यवस्था पुढील ७-८ वर्षे वस्तू आणि सेवांची निर्मिती करत राहिली आणि मागणीत वाढ होत राहिली.

* तर २०२५ पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट होईल. असे आपले म्हणने आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न एकूण २०२५ पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट होईल. असे आपले म्हणणे आहे.

* सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न एकूण २५०० अब्ज डॉलर आहे. २०२५ पर्यंत हे उत्पन्न ५००० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचेल असे यांचे म्हणणे आहे.

* भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाई दराची मर्यादा ४% घालून दिली आहे. २% उणे अधिकपर्यंत फरक असू शकतो. फेब्रुवारी महिन्यात घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक २.४८% नोंदला गेला होता. तर किरकोळ किमतीवर आधारित निर्देशांक ४.४४% नोंदला गेला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.