बुधवार, ७ मार्च, २०१८

श्रीलंकेत आजपासून १० दिवस आणीबाणी - ७ मार्च २०१८

श्रीलंकेत आजपासून १० दिवस आणीबाणी - ७ मार्च २०१८

* सिंहली बौद्ध आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये उसळलेल्या दंगलीचे लोण इतर भागात पसरू नये म्हणून श्रीलंकेच्या सरकारने देशात आजपासून १० दिवसासाठी आणीबाणी लागू केली आहे.

* सिंहली बौद्ध आणि मुस्लिम धर्मियांमधील तणावाचे पर्यवसान दंगलीमध्ये झाल्यानंतर दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी देशात आणीबाणी लागू करण्यात आली.

* मागील १ वर्षांपासून श्रीलंकेतील सिंहली बौद्ध आणि मुस्लिम धर्मियांमधील तणाव दिवसेंदिवस वाढतो आहे. एका सिंहली व्यक्तीचा जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये सोमवारी मृत्यू झाला होता.

* थेलडेनिया भागात ही घटना घडली होती. या घटनेनंतर दोन्ही समुदायामध्ये दंगल उसळली. कँडी शहरातही याचे पडसाद उमटले असून, येथील दंगल आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

* संघर्षांची कारणे -

* फेब्रुवारी २०१७ मध्ये श्रीलंकेतील पूर्व भागात असलेल्या अंपारा येथे हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर मुस्लिम व सिंहली बौद्ध धर्मियांमधील संघर्ष सुरु झाला. वर्षभर हा संघर्ष कायम आहे.

* जून २०१४ मध्ये एलूथगामा येथे दंगली उसळल्या होत्या. त्यानंतर मुस्लिमविरोधी मोहीम सुरु झाली. मुस्लिम हे सक्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याचा आरोप सिंहली बौद्ध धर्मियांनी केला होता.

* म्यानमारमध्ये संघर्ष उसळल्यानंतर काही रोहिंग्या मुस्लिमांनी श्रीलंकेचा आश्रय घेतला. श्रीलंकेतील बौद्धांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले.

* अल्पसंख्यांक मुस्लिम हे आपल्यासाठी धोकादायक असल्याचे सिंहली बौद्धांचे मत आहे. श्रीलंकेत २०१४ मध्येही मोठ्या दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत २ हजाराहून अधिक बौद्धांना विस्थापित व्हावे लागेल. तर ८ हजाराहून अधिक मुस्लिम नागरिक विस्थापित झाले होते.

* श्रीलंकेत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ७५% आहे. तरीही तमिळ समुदाय आणि मुस्लिम समुदाय हे आपल्यासाठी घातक आहेत. असे बौद्ध धर्मियांना वाटते.

* मुस्लिम समुदायाला पूर्वेकडील देशातून मदत मिळते. त्या जोरावर ते आम्हाला संकटात टाकू शकतात, असे मत २०१४ मध्ये देण्यात आलेल्या मुलाखतीत एका बौद्ध भिक्खूने मांडले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.